Picture of the author
List your BusinessAccount
LOGIN/ SIGNUP
Home AboutProducts/ServicesWhy Us
Home AboutProductsWhy Us

Introduction

कृषी संस्कृती हा स्टार्टअप आहे, जो सामुदायिक शेती (Community Farming) आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन (Supply Chain Management) क्षेत्रात कार्यरत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जमिनीचे विभाजन, पारंपारिक शेतीचे मर्यादित स्वरूप, रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे निर्माण झालेले आजार जसे की कॅन्सर, जमिनीचा खालावलेला पोत, शेतीसाठी उपलब्ध मनुष्यबळाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती, आणि अनिश्चित बाजारभाव या समस्या शेतकऱ्यांसमोर आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीवर झालेले परिणाम आणि भविष्यातील शेतमालाच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत लक्षात घेऊन कृषी संस्कृती शेतकऱ्यांना शाश्वत आणि शास्त्रीय पर्याय उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवते. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना थेट तज्ञांशी आणि बाजारपेठेशी जोडणे, तसेच विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांना वाटचाल करण्यास प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे. कृषी संस्कृतीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विकसित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना एकत्र आणून तज्ञ सल्ल्याने शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून शेतमालाची गुणवत्ता वाढवणे. तसेच, त्या शेतमालाचे गुणवत्ता प्रमाणीकरण करून तो अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, असे आहे. कृषी संस्कृती शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना शाश्वत, शास्त्रीय आणि तंत्रज्ञान आधारित शेतीची साधने पुरवून शेतीमालाची गुणवत्ता सुधारण्यास आणि शेतकऱ्यांचा फायदा वाढवण्यास मदत करते.

Picture of the author

Vision

"शाश्वत तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांना सशक्त करणे, गुणवत्तापूर्ण आणि विषमुक्त शेतीमाल उत्पादनास प्रोत्साहन देणे, तसेच शेतकऱ्यांना तज्ञ आणि बाजारपेठेशी थेट जोडून त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावणे." कृषी संस्कृतीचा उद्देश शेतकऱ्यांना सामुदायिक शेतीच्या माध्यमातून एकत्र आणून, तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतील आव्हानांचा सामना करून शाश्वत, वैज्ञानिक आणि गुणवत्ता प्रमाणीकरणासह शेतीमालाचा पुरवठा करणे आहे.

Picture of the author

Mission

"शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय शेती पद्धतींचा वापर करून शाश्वत व गुणवत्ता प्रमाणित शेतीमाल उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे. शेतकऱ्यांना तज्ञांचे सल्ले आणि बाजारपेठेशी थेट जोडून त्यांची उत्पादकता व उत्पन्न वाढवणे, तसेच शेतीमाल अंतिम ग्राहकांपर्यंत गुणवत्ता प्रमाणीकरणासह पोहोचवणे." कृषी संस्कृती शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाधारित उपाय आणि तज्ञ सल्ल्याद्वारे योग्य मार्गदर्शन करते, जेणेकरून ते उच्च गुणवत्तेचे, विषमुक्त उत्पादने तयार करून, टिकाऊ शेती पद्धतींचा अवलंब करू शकतील.

Picture of the author

Value

शाश्वतता (Sustainability): शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून पर्यावरणस्नेही आणि दीर्घकालीन फायद्याचा विचार करणे. गुणवत्ता (Quality): शेतमालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून गुणवत्ता प्रमाणीकरण सुनिश्चित करणे. प्रामाणिकपणा (Integrity): प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना विश्वासार्ह सेवा आणि तंत्रज्ञान प्रदान करणे. समावेशकता (Inclusivity): शेतकरी समुदायाला एकत्र आणून त्यांना आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण देणे. नाविन्यता (Innovation): आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील आव्हानांना सर्जनशील आणि वैज्ञानिक मार्गांनी सामोरे जाणे. सहकार्य (Collaboration): शेतकरी, तज्ञ आणि बाजारपेठेतील विविध घटकांशी सहकार्य साधून सर्वांसाठी मूल्य निर्माण करणे. पारदर्शकता (Transparency): पुरवठा साखळीत पारदर्शकता राखून शेतकरी व ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे.

Reviews
0.0
(0 Ratings)

No Ratings Yet

Contacts Us Now

QUICK LINKS

  • Home
  • About
  • Products/Services


Get Directions

Contact Person

+91 *****

WHATSAPP

Developed & Managed By Thirsty Maart 2025 | All Rights Reserved

Picture of the author

Krishi Sanskriti

Category : Agriculture and Farming

Community Farming Market Linkage Precision Agriculture

Conected to 37
hearts Recently

0.0
( Ratings)
Chat
Picture of the author

Krishi Sanskriti

Agriculture and Farming

Community Farming Market Linkage Precision Agriculture

0.0
( Ratings)

Conected to 37 hearts Recently

Chat

10 am - 8PM

1731/19,B,New Mahadwar Road,Balwant Shree Get Directions